Sunday, December 6, 2015

तू कोई और है

आज मी एकटी एक सिनेमा बघायला गेले. ‘मजबुरी’ म्हणून नाही तर बघायचा होता म्हणून! माझी एकटे जाऊन सिनेमा बघायची खूप वर्षे इच्छा होती, पण कधी तशी वेळ आली नाही. या वेळेस सुद्धा आली नसती, परंतु संधीची चाहूल लागताच मी ठरवलं कि यावेळेस नक्की! सिनेमा संपल्यावर समोरच्या क्यानी मध्ये मी एका अनोळखी मुलीसोबत table share केले. हा अनुभवदेखील पहिलाच! मी माझा सुलेमनी चहा पिता पिता तिच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. असे अनुभव खऱ्या अर्थाने माणसाला समृध्द करतात!

सिनेमा ह्या गोष्टीकडे नेहमीच एक social गोष्ट म्हणून पहिले जाते. त्यात तत्थ्य असले तरी सिनेमा हा एक वैयक्तिक अनुभव असायला हवा. निदान माझ्यासाठी तरी आहे!
For me, cinema is all about what it makes you feel. Cinema is a piece of art. We should pay attention to its craft. There a quote by Rainbow Rowell from a brilliant book called ‘Eleanor and Park’. It says, “Eleanor was right. She never looked nice. She looked like art, and art wasn’t supposed to look nice; it was supposed to make you feel.” So I try to measure everything that I see against that unit. How much does it make me feel? Feelings can be either happy or sad, either easy or uneasy. Sometimes both!

And ‘Tamasha’ is such experience!


सिनेमाची झलक बघितल्यापासून हा सिनेमा बघायची उत्सुकता निर्माण झालेली! अशा गुंतागुंतीच्या संहितांबद्दल मला नेहमीच उत्सुकता असते. माणसाच्या आत नक्की काय सुरु असते याचा माग घेता घेता खूप साऱ्या नवीन गोष्टी सापडतात. मनुष्याच्या भावनिक विश्वाचे कंगोरे उलगडणे हे एक प्रकारचे वेड आहे. अशा एखाद्या वेडाचा अनुभव घेतल्यानंतर तुम्ही अनाहूतपणे जगाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहता. सिनेमागृहातून परत येतेवेळेस मी ती जादू सगळीकडे पाहत होते. लग्नाच्या मंडपाची सजावट करणाऱ्या मजूराच्या त्या मलमली कापडाच्या सारख्या मापाच्या घड्या घालून खिले ठोकण्यात किंवा टाकीवर आपल्या छोट्या मुलीला बसवून बाईकवरून वेगाने माझ्या समोरून गेलेल्या त्या जोडप्यात! हीच खरी मजा आहे! 

A photo posted by Manali Satam (@saatman) on

Being high on life,
सात्मन्

Saturday, October 10, 2015

स्वच्छंदी ते सात्मन्

सध्या प्रश्न हा आहे की मी पुन्हा इथे का आलेय?

मी २०१० मध्ये बारावीची परीक्षा झाल्यानंतर हा ब्लॉग लिहायला सुरु केलेला. आणि तेव्हाची कारणं ही खूप वेगळी होती. तेव्हा आतली घुसमट कुठेतरी व्यक्त व्हावी ही इच्छा होती. (VERSION - 2010)

परंतु आता विचार केल्यावर असं जाणवतंय की बरंच काही बदललंय आणि रोजच्या रोज बदलतंय. ह्या बदलांची कुठेतरी नोंद करून ठेवायला हवीये.
जर तुम्ही या आधी इथे कधी आला असाल तर तुमच्या लक्षात येईल की ह्या ब्लॉगचे नाव आता ‘सात्मन्’ असे झाले आहे. पूर्वी ते ‘स्वच्छंदी’ असे होते! आणि ह्या ब्लॉग चा address meemanali.blogspot.in असा होता! आणि आता मला त्या गोष्टीची लाज वाटत होती. म्हणजे स्वतःचं नाव त्या ब्लॉग address मध्ये ठेवण्यासाठी मी (mee) केलेला अट्टाहास आता मला नकोसा वाटत होता. आता नाहीये मी तशी! मी स्वच्छंदी देखील नाहीये. होय, हे खरं आहे. आणि मला त्याचा स्वीकार करणं हे शिकायलाचं हवं. मी स्वच्छंदी विचार करत असेन, परंतु मी स्वच्छंदी वागत नाही. त्याला बरीच कारणे आहेत. स्वच्छंदी हा एक प्रकारचा escape होता बहुतेक! त्या वेळेस मी जशी आहे त्याबाबत comfortable नसल्याने स्वत:च निर्माण केलेला एक आभास होता तो. आता देखील मी जशी आहे त्याबाबत मला चिक्कार तक्रारी आहे. पण ठीक्ये, मी दुसरी बाजू देखील आता आत्मसात करू शकते. मला पळ काढायची काही एक गरज वाटत नाही. And it’s such a good feeling!

मी पुन्हा ब्लॉग लिहायला सुरु करायचा विचार केल्यानंतर (आणि redesign केल्यानंतर) जुने posts वाचले. मला खरंच एखादा self-roast सादर करायची इच्छा होतेय. I mean I get it, की तेव्हाच्या काळासाठी ते योग्य होतं वगैरे! पण आता मला निव्वळ हास्यास्पद वाटतात काही posts. डोक्यात त्या delete करायचा विचार देखील आला एकदा. परंतु ते थोडं भ्याड वगैरे होईल, म्हणून तो विचार सोडून दिला. #embrace दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आता कविता करत नाही. मला माहीत नाही की मला कसं जमायचं. पण आता नाही जमत. किंवा मी लिहायचा प्रयत्न करत नाही. जे काही असेल ते, मुद्दा हा आहे की इथे कविता वाचायला मिळायची आशा असल्यास भ्रमनिरास होईल.

मी माझ्या diary (नोंदवही?) मध्ये लिहित असते अधेमध्ये. तेच आता जरा elaborately लिहायचा विचार आहे. स्वत:ला थोडी शिस्त लावायचा हा प्रयत्न आहे. कोणाशीतरी संवाद साधण्यासाठी दिलेली ही हाक आहे. आणि स्वत:ला समजून घ्यायचा हा अट्टाहास आहे.

-         - सात्मन्

ता. क.: मी ह्या ब्लॉगसाठी खास नवीन facebook page बनवले आहे. ‘स्वच्छंदी’चे अर्थात delete केलेय. Updates साठी ते Like करा. (link : ह्या ब्लॉगच्या नैऋत्य कोपऱ्यात :P )

Friday, January 3, 2014

2013

मी  २०११ मधील आठवणी लिहिल्या होत्या. २०१२ मध्ये आळशीपणा केला. पण या वर्षी ठरवलंय मी, उशीर झाला तरी चालेल पण लिहायचं. खरं सांगायचं तर सगळं किती बदलल्या सारखं वाटतं. म्हणजे दोन वर्षांपूर्वी लिहिलेल्या गोष्टी वाचून तर मी खूप दूर आल्यासारखं वाटतं मला. आणि मला माहितेय ही चांगली गोष्ट आहे, कारण माझा प्रवासावर खूप विश्वास आहे. ३६५ दिवसांत जर तारखेशिवाय काही बदललं नसेल, तर ते दिवस वाया गेल्या सारखे आहेत. नाही का?
आता मी सांगेन त्या आठवणी ह्या घटनाक्रमानुसार (order-of-occurence :P) आहेत, त्यात आवड-नावड असं काही नाही. :D

१.      Canvas 2
गेल्या वर्षी जानेवारी मध्ये मला माझा पहिला वहिला smartphone मिळाला. देसी कंपनी चा स्वस्त आणि मस्त फोन! जेव्हा मी ठरवलं कि हा फोन घ्यायचा तेव्हा अर्थात बरयाच लोकांनी नाकं मुरडली. पण खरं सांगते, it’s been really good! J कॅमेरा पेक्षा फोटोग्राफर महत्त्वाचा तसेच फोन वापरणारा कितपत फोन चा वापर करतो हे महत्त्वाचं ! मी नेहमी फोन ला चिकटून असते हि एक बाब सोडली तर, सगळं किती सोपं वाटतं ह्या फोन्स मुळे.
ह्या फोन मुळे अजून एक अगदी सहज शक्य झालेली गोष्ट म्हणजे फोटोज काढून share करणे. ह्याला एकच उत्तर आहे Instagram! सध्या मी एक प्रोजेक्ट पण हाती घेतलाय, #Project365. मजा येतेय मला!
Instagram

२.      Hair-cut
गेल्या वर्षीच्या मार्च मध्ये मी आणि माझ्या बहिणीने केस अगदी कमी ठेवायचे असं ठरवलं. म्हणजे अगदी सहज, खास असं काहीच कारण नाही. एक प्रयोग म्हणून. खरंतर माझे केस हे माझं best feature आहे. मी जर थोडीफार सुंदर किंवा छान दिसत असेन, तर त्याचा संपूर्ण श्रेय त्या लांब केसांना जातं. आणि त्यांना असं अचानक (कोणालाही धड न सांगता) कापून टाकणं, हा माझ्या आयुष्यात (कदाचित) झालेला सगळ्यात मोठा बदल असेल.
(मी उगाच issue करतेय असं काही जणांना वाटू शकेल (esp. पुरुषमंडळी), पण मला आशा आहे की काही female-जात मला समजून घेतील.)
सगळ्यात मजा ही लोकांचा प्रतिसाद बघून आली! म्हणजे जी कालपर्यंत व्यवस्थित होती तिने असा दीड-फूट केस कापून टाकण्याचा वेडेपणा का केला, हे त्यांना कळत नव्हतं. समजू शकते मी त्यांना! पण i guess वेडेपणा होता म्हणूनच मी तो केला! :D३.      F.R.I.E.N.D.S
(hahaa i can already see some of you smiling
J )
तर ह्या वर्षी मी Friends बघायला सुरुवात केली. सध्या मी सातव्या सिझन वर आहे. त्यांचं आयुष्य बघताना खरंच खूप मजा येते. त्यांचे स्वभावगुण आणि एकमेकांसाठी नेहमी ‘असणं’ तुम्हाला खुश करून जातं. एखाद्क्षणी तुम्हाला कंटाळा आल्यासारखा वाचत असताना, फक्त Friends ची २५ मिनिटं तुम्हाला पुन्हा वरती आणू शकतात ह्या वर मी काही हरेन. अशा सोप्या गोष्टी बनवणं आणि दहा वर्षे त्याच्याशी खरं राहणं हे खरंच खूप कठीण आहे. म्हणूनच कदाचित ही मालिका अजूनही एवढी लोकप्रिय आहे.

४.      One Direction
(ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी : One Direction हा ५ मुलांचा Pop Band आहे.)
सो, ही पाच मुलं माझ्याच वयाची आहेत. ते अतिजास्त लोकप्रिय आहेत. जगभरातून कोटी कोटी चाहते आहेत त्यांचे. एरवी क्षणभंगुर वाटणाऱ्या या आयुष्यात त्यांनी या वयात मिळवलेलं यश हे खूपच मोठं आहे. ते त्यांच्या स्वप्नातील आयुष्य जगताहेत.
ही मुलं माझ्याच वयाची असल्याने कदाचित, पण मी त्यांना follow करते. त्याने कुठेतरी मला जाणीव होते कि अजून किती काही मिळवायचं आहे आयुष्यात. आणि मी स्वप्न बघायला लागते.५.      shifting
गेल्या वर्षी आम्ही आमच्याच कॉलनीमध्ये मोठ्या घरात शिफ्ट झालो. (1BHK to 2BHK)
त्यामुळे मग मला आणि माझ्या बहिणीला आमची अशी एक स्वतंत्र खोली मिळाली. आमची रूम आम्ही स्वत: सजवली आहे. अगदी आम्हाला हवी तशी. स्वत:च घर स्वत: सजवण्यात एक वेगळीच मजा आहे. अजूनही आम्ही काही ना काही नवीन करतच असतो रूम मध्ये! स्वत: ची रूम असल्याने ‘मैत्रिणीं’सोबत stay-over पण सोपे झालेत. ;) :D
(BTW नवीन रूम सोबतच मला नवीन laptop पण मिळालाय! ह्या laptop वरून type करताना उगाच professional वगैरे झाल्यासारखं वाटतं. :P)

ता. क.: माझं लिहिणं खूप बदललंय असं वाटतंय मला, कारण मला लिहिताना देखील थोडं कठीण वाटत होतं.

ता. ता. क.: २०१२ मधल्या दोन खूप मोठ्या आठवणी इथे लिहिल्यावाचून आता राहवत नाहीये. सो प्लीज समजून घ्या.
२०१२ मध्ये मी राज ठाकरे ला भेटले. तेही त्यांच्या घराच्या बाहेर.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी २०१२ मध्ये शिट्टी मारायला शिकले. बोटांनी मारतात ती वाली. एकदम भारी वाटतं. :D 

Sunday, June 30, 2013

दुनियादारी

"ये महलो, ये तख्तो, ये ताजो की दुनिया, 
            ये इंसान के दुश्मन समाजो की दुनिया,
   ये दौलत के भूखे रवाजो की दुनिया,
              ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या हैं?"
         
 "दुनियादारी" वाचून झालं नुकतंच… मी हललेय पार आतून! म्हणजे हे असंच असतं का? कोणीच चूक आणि कोणीच बरोबर नसतं बहुतेक. शेवटी सगळं परिस्थितीच्या मनात असतं तसंच घडतं. मग ही स्वत:ची ओढाताण कशासाठी? आज इथे जिंकून मिळवायचं ते काय आणि हरायचं ते काय???

परिस्थिती आपल्याला सर्व या अशा मार्गाने का शिकवत असते? आज या क्षणी माझी जी काही स्वप्नं आहेत, ती जर उद्या पूर्ण झाली नाहीत तरी मी चालतंच राहणारेय. खरंतर, मला चालतच राहावं लागणार आहे. आज जर मला मध्ये काही सोडावं लागलं, तर ते पाठी ठेऊन मी पुढे जाणारेय…

आजचे क्षण या उद्याच्या आठवणी आहेत. ज्या क्षणांना मी आज जपत नाही, त्या उद्या नाहीशा होणारेत. हा सिद्धांत आहे आणि या सिद्धांतावर माणूस निर्माण झाला आहे. 

पण मग या आयुष्यात येणाऱ्या छोट्या छोट्या पर्वांचे काय? ती अशीच निघून जाणार वाटतं, भूतकाळात जमा होणार. हा आठवणींचा buffer-overflow झाला, तर काहीतरी garbage-collection सारखं mechanism वापरावं लागेल. पण मग त्या क्षणाचं काय, ज्या क्षणी आपण हे असे, आपल्या आठवणींतले, क्षण आयुष्याच्या प्रवाहात सोडून देणार. त्यांना धरून ना आपण जगू शकणार, ना पुढे जाऊ शकणार… 

अशी, काही क्षण किंवा आठवणी सोडून द्यायची, वेळ माझ्यावर भविष्यात आली, तर मी काय करेन? काय सोडून देईन मी?  त्याहीपेक्षा काय धरून ठेवायला आवडेल मला?
बहुतेक मला माझी उत्तरे सापडताहेत… आणि तुला…?

- सात्मन

ता. क.:

Saturday, October 13, 2012

आयुष्यात पुढे जायचं असतं...!


आज लिहावंसं वाटतंय... किंवा कदाचित कॉम्प्युटर रडत-खडत चालतोय म्हणून  असेल... 
हे लिहिणं आता जमेनासं झाल्यासारखं भासतंय... स्वत:बद्दल बरंच काही बदलल्यासारखं जाणवतंय, सभोवतालचं जग देखील बदलल्यासारखं वाटतंय... असं वाटतंय की या सगळ्या बदलांत आपण कुठेच नव्हतो आणि आज अचानक यात पडलोय, एखाद्या अनभिज्ञासारखे!

सगळं नवीन! पण जुन्या जगाची आठवण करून देणारं ... तिथे परत जाण्याची आस निर्माण करणारं... कुठेतरी किंवा कधीतरी ते जग परत येईल अशी आशा निर्माण करणारं... वेगळं! पुन्हा नव्याने सुरुवात कर, असं सांगायचं असेल त्याला... पण ना काही पूर्वसूचना, ना मार्गदर्शक इशारा... विशाल महासागरात हरवलेल्या बोटीच्या खलाश्यासम... एकटं, स्वबळावर!

पण त्या खलाश्याच्या मनातील विजीगिषु वृत्ती आपण कशी जागवणार... त्याला वेड असतं... तो त्याचे स्वप्न पूर्ण करायच्या इच्छेपोटी वेडा होऊन जातो... स्वत:ला हरवून बसतो! त्या नाविन्याच्या शोधात असं स्वत: हरवून जाण्यात ते सुख तरी काय असतं?

स्वत:ला शोधण्यात वेळ व शक्ती दोन्ही खर्च होतेच, पण मग हे काम युक्तीने चालवावं तरी कसं! युक्तीने संपूर्ण जग खरंच चालू शकतं का? आणि जर ते चालत असेल, तर ती युक्ती शोधावी तरी कुठे! व्यक्ती तशा प्रकृती म्हणतात, त्याप्रमाणे व्यक्ती तशा युक्ती असतील ना जगात... पण त्यातली आपली ती कोणती???
ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं खरंच अस्तित्वात आहेत का? असतील तर ती मला कुठे सापडतील आणि नसतील तर हा सर्व खटाटोप तरी का करा! यातून मिळणार ते काय! बरेचसे प्रश्न अनुत्तरीत राहणार आणि या अनुत्तरीततेत लपलेलं अपूर्णत्व आणि असमाधान डोकं वर काढणार आणि चक्र पुन्हा सुरु होणार... समाधानतेकडे आणि सुखाकडे वाटचाल करायला आपण सुरुवात करणार आणि कितीही काही झाले तरी मिळवायचेच अशी ईर्षा निर्माण होणार...

आपण त्या चक्रात गोल-गोल फिरत राहणार... भूतकाळ पाठी सारून भविष्याकडे वाटचाल करत राहणार... रिकाम्या हाताने! हात धरणारे बरेच येतील, परंतु हात भरणारे फार कमी...! त्यांना जपणं शिकायला हवं... त्यासोबत समोरच्याचा हात भरणं देखील जमलं पाहिजे... एकमेकांचे हात भरून एक पूर्णत्व येईल, परंतु भरलेले हात धरू शकत नाही याचं असमाधान देखील...!

असो! 
आपण निव्वळ चक्रात गोल-गोल फिरायचं असतं आणि बस्स आयुष्यात पुढे जायचं असतं...!
- सात्मन् 

Monday, June 11, 2012

जग एक कोवळा भास...


भीती दाटली आज मनी,
कसा सावरू सारा डाव,
सरल्या आठवणी जणू,
पाडूनी हृदयावर घाव...

वाटे भेटावे आज तिला,
द्यावे नात्यास नवे नाव,
समुद्री उफाळल्या लाटा,
सावरावी बुडती नाव...

स्वप्न सानुले पाहिले जे,
पूर्णत्त्व आहे देणे त्यास,
वादळात अडकुनी या,
नासे जगण्याची आस...

आरशात पाहुनी मज,
मी सोडला एक नि:श्वास,
लख्ख दिसले त्या डोळ्यांत,
जग एक कोवळा भास...

- सात्मन 
(१९-०५-२०१२) 


Thursday, January 26, 2012

शाळा = निरागसता !

"त्यादिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत, बाकं आहेत, पोरं-पोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र सुध्दा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत. त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते. खास एकट्याचीच. त्या शाळेत वर्ग नाहीत, भिंती नाहीत, फळा नाही, शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे..." :)

शाळा चित्रपटाने मला काय दिलं??? तर बऱ्याच दिवसांनी काहीतरी गोड, निरागस आणि तरल गोष्ट ऐकल्याचा, पाहिल्याचा आनंद! :)
आणि शाळा कादंबरीने मला काय दिलं होतं, तीच गोष्ट वाचल्याचा आनंद...! शाळा कादंबरी ही बहुतेकांच्या आवडत्या पुस्तकांतील एक आहे, अर्थात माझ्याही!!! ते पुस्तक वाचून आता दीड वर्षं झाली, पण सगळं कसं अगदी मनावर कोरलं गेल्याप्रमाणे लख्ख! क्षणात वेड लावलं कादंबरीने... आणि मग कुठेतरी ऐकिवात आलं की शाळा कादंबरीवर सिनेमा येणारेय... एवढा आनंद झाला म्हणून सांगू!

म्हणजे जी पात्र, ज्या जागा आणि ज्या भावनांची आपण निव्वळ एक कल्पना केली होती, ते विश्व दृश्य स्वरूपात पाहायला मिळणार याचा तो आनंद होता... आणि सिनेमा पाहिल्यावर तर त्या आनंदाने परिसीमा ओलांडली. सिनेमाची एकेक फ्रेम जशी पुढे सरकत होती तसं काही ना काही सापडत होतं. खूप साऱ्या गोष्टी आठवत होत्या, मनातील खूप सारे भाव मुक्त होत होते. कुठेतरी मन विचार करत होतं की आपण नववीत असताना असेच होतो का??? आपणही अशीच मजा करायचो का??? आणि केली असली तरी ती इतकी निरागस होती का? म्हणजे बघा ना, तो काळ आहे अंदाजे ७५ सालचा, जेव्हा देशावर आणीबाणी लादलेली होती. त्या काळातील ही ईयत्ता नववी मध्ये 'नववी ब' मध्ये (मी नववी ब मध्ये होते ना, मेन्शन तर झालंच पाहिजे :P ) शिकणारी मुलं! त्यांचे ते ऐन तारुण्यातील अनुभव, खरंतर धांदल! कुठेतरी प्रत्येकाने अनुभवलेलं... पण आजही ते तेवढंच निरागस आहे का हा प्रश्न मात्र सतावतो मला! आज कुठे आपल्याला एवढा वेळ असतो की आपण त्याच्याकडे किंवा तिच्याकडे असे कटाक्ष टाकणार आणि मग त्या व्यक्तीच्या नजरेत काहीतरी शोधायचा प्रयत्न करणार. अबोल भावनांचा अर्थ लावणार आणि मग त्या आठवणींत जगायचा प्रयत्न करणार. चिठ्ठी लिहिणार! या सर्व गोष्टी नाही म्हटल्या तरी हद्दपार होताहेत, मुलं लवकर 'मोठी' होतात सध्या, असं आपलं सगळे म्हणतात, आणि काही अंशी ते खरंदेखील आहे... असो!

सिनेमा सुरु झाल्यावर सर्वात आधी लक्षात येते ते सिनेमाचे छायाचित्रण! एक विपुल निसर्ग सौंदर्य लाभलेलं टुमदार गाव, त्या गावची शाळा, देउळ! सगळं एवढ्या एस्थेटिकली दाखवलंय कि त्याला खरंच तोड नाहीये... दुसरी गोष्ट म्हणजे पात्र निवड! प्रत्येक कलाकाराने त्याच्या भूमिकेला अपेक्षित असेच काम केलेले आहे. जोश्याची कटकट करणारी ताई, सदैव काळजी करणारी आई आणि समजून घेणारे बाबा! इतिहास, भूगोलाचे मांजरेकर सर आणि 'यो' मामा! (जितु!!!) सगळेच अगदी चपखल! सिनेमा बराच वेगवान आहे, पण त्यायोगे अवघ्या पावणेदोन तासात कादंबरीतील बऱ्याच गोष्टी दिग्दर्शकाने दाखवल्या आहेत. जे अर्थात स्वागतार्ह आहे. परंतु कळस हा आहे की, संपूर्ण सिनेमाभर एक निरागसता दाटून राहिलीये, त्या निरागसतेच्या छायेतच आपण हसतो, खिदळतो, शिट्टी मारण्यास धजावतो,लाजतो आणि प्रसंगी गहिवरून देखील जातो... आणि याचे संपूर्ण श्रेय दिग्दर्शकाचेच आहे. सगळंच कसं अगदी तरल...

हा सिनेमा पाहिल्यावर उगाचच कुठेतरी ती 'निरागस'वाली स्ट्रीक जागी झाल्यासारखी झाली. मग उगाचच कोणी एखादा कटाक्ष टाकतोय का, हे पाहण्यासाठी डोळे भिरभिरायला लागले. आपण कोणावर तरी 'लाईन' मारावी असंदेखील वाटलं... :D आणि हे असं सगळं वाटण्याचं संपूर्ण श्रेय शाळा च्या कलाकारांना जातं. प्रत्येकाने एवढा सहज अभिनय केलाय, की आपण विसरून जातो, आपण एक सिनेमा पाहतोय. सगळं अगदी आपल्या डोळ्यांसमोर घडतंय असंच वाटायला लागतं. जोश्याची बोलण्याची ढब आणि शिरोडकरचे सौंदर्य पार गुंतवून टाकतं आपलं मन! तिच्या त्या दोन वेण्यांत माळलेली फुलं असोत वा तिचा आवाज, सगळ्यात सौंदर्य ठासून भरलेलं... आणि आपण त्याचा आस्वाद घेत राहतो. त्यांनी एकमेकांकडे टाकलेले कटाक्ष आणि त्यायोगे त्याचं झालेलं बोलणं जणू आपण ऐकतोय असं वाटायला लागतं. तिचं प्रत्येकवेळी मागे वळून पाहणं, गालात हसणं, डोळ्यांनीच मंजुरी देणं, सगळंच मन:पटलावर कोरलं गेलंय... कुठेतरी प्रत्येक क्षणी जोशी आणि शिरोडकर आपल्याला प्रेमात पाडतात... अगदी नकळत! हे सर्व चालू असताना काळजाला भिडणारं पार्श्वसंगीत आपल्याला साथ देतं आणि 'आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणाऱ्या पांढऱ्या पक्ष्यांसारखे मुक्त होतो...'


जोशी आणि शिरोडकर! :)